उकडीचे मोदक Ukadiche Modak Recipe

Ukadiche Modak उकडीचे मोदक 

Ukadiche Modak | उकडीचे मोदक | Modak Recipe

Preparation time (तयारी वेळ) : 30 min
Cooking time (स्वयंपाक वेळ) : 15 min

Ukadiche Modak (उकडीचे मोदक ) :

उकाडीचे मोदक ही गणेश चतुर्थीच्या उत्सवात तयार केलेली एक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. हे वाफवलेल्या तांदळाच्या पिठापासून बनवले जाते आणि त्यात गूळ आणि किसलेले खोबरे यांचे गोड मिश्रण आहे. हात वापरुन किंवा साचा वापरुन - मोदक दोन प्रकारच्या आकारात आपण बनवू शकतो. साचा वापरणे नवीन शिकणाऱ्यांस चांगले आहे आणि आपल्याला मोदकसह चांगले परिणाम मिळतात जे स्टीम (उकळणे) केल्यावर मोडत नाहीत. हातांनी मोदक फिरविणे आणि आकार देणे योग्य होण्यासाठी बराच सराव लागतो.

उकाडीचे मोदक गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून बनविला जातो. संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थीलाही महाराष्ट्रीयन लोक हे आवडीने बनवतात.

Modak (मोदक )  is an Indian sweet popular in many parts of India. The sweet filling on the inside of a modak consists of freshly grated coconut and jaggery while the outer soft shell is made from rice flour or wheat flour mixed with khava or maida flour. The modak can be fried or steamed.


साहित्य (The Ingredients List) :

2 कप ओल्या नारलाचा खीस (२०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे)

1/2 tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर

1 टेबलस्पून तीळ

1 टेबलस्पून खसखस

1 टेबलस्पून काजूचे काप

1 टेबलस्पून बादाम काप

3 टेबलस्पून साजूक तूप

1 टेबलस्पून मावा

500 ग्रॅम बासमती तांदळाचे पीठ

100 ग्रॅम गुळ (एक कपाहून थोडा कमी गूळ बारीक चिरून किंवा किसून)

चिमूटभर मीठ

केसर( आवक शता असल्यास)


कृती : (How To Make Modak Step by Step)

  1. आधि तांदूळ धुवून त्यांना निथळून घ्या किंवा उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर तांदूळ पिठासारखे बारीक दलून घ्या.
  2. सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. ( 2 कप ओल्या नारलाचा खीसामधे एक कपाहून थोडा कमी गूळ बारीक चिरून किंवा किसून ).
  3. नंतर पॅन (पातेला) गरम करून तीळ , खसखस भाजून घ्या. त्यानंतर पातेल्यात साजूक तूप  गरम करून त्यामध्ये गूळ घालून वितळून घ्या. यानंतर (गूळ वितळल्यावर ) पातेल्यात किसलेला नारळ आणि गूळ चांगला एकत्र (mix) करून घ्या.साधारण 3-4-. मिनिटे परता.
  4. गूळ वितळला कि यात आता हिरवी वेलची , जायफळ पावडर , तीळ , खसखस , dry fruit (बादाम , काजू) घालून एकत्र करुन घ्या.ढवळून बाजूला ठेवून द्यावे.सुमारे एक मिनिट चांगले मिक्स करावे. 
  5. पीठाची उकड साठी भांड्यात तूप सोबत पाणी आणि चिमूटभर मीठ घाला. आणि नंतर तांदळाचे पीठ घालून ती उकड शिजवून घ्यावी .ढेकूळ तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सतत ढवळत राहा.हे मिश्रण कमी गॅसवर सुमारे २- 3 मिनिटे शिजवा.
  6. जर उकड कोरडे किंवा कडक दिसत असेल तर थोडे कोमट पाणी घालावे आणि ते पूर्णपणे गुळगुळीत व लवचिक होईपर्यंत पीठ मळून घ्यावे आणि उकडीला ओले ठेवा आणि ओलसर कापडाने झाकून ठेवा.
  7. आता उकडीचे लहान तुकडे करा.पीठाचा एक गोळा घ्या आणि तो आपल्या हातात ताणून साधारणतः 3-4 इंच व्यासाचे गोल पाऱ्या बनवाव्यात.एकदा झाले की त्या पाऱ्यामधे नारळ-गूळ( सारण ) भरणे. आणि मोदकाचा आकार दयावा.अशाप्रकारे मोदक तयार करून ठेवावेत.
  8. नंतर मोदक पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून 10-15 मिनीटे वाफ काढावी.
  9. 10 मिनिटांनी तयार मोदक काढून घ्या. हे मोदक दोन दिवस टिकतात.

Ukadiche Modak Recipe With Photo :

Ukadiche Modak Recipe

Finally, i request you to check my other detailed recipes with this post Ukadiche Modak recipe. it mainly includes my other detailed recipes like Rasmalai , Chicken momos, Cheese balls, Rasgulla, Diet Nutribar ,Manchurian , Schezwan rice , Poha Cutlet , medu vada , dahi vada.
I would also like to mention my other recipes categories like sweet , snacks , non-veg.

In addition, do visit my other related recipes collection on my Kitchen Recipe blog(https://vbrecipe.blogspot.com).


उकडीचे मोदक Ukadiche Modak Recipe उकडीचे मोदक Ukadiche Modak Recipe Reviewed by Kitchen Recipe on August 29, 2020 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.